वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथे १९३६ मध्ये भरलेले पहिले काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिवेशन होते व या अधिवेशनातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होऊन त्यासाठी योजना आखण्यात आली व ती १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खºया अर्थाने पूर्णत्वास आली. त्यामुळे फैजपूर अधिवेशनाला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे व स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे असलेले योगदान कोणी विसरू शकणार नाही हे अधिवेशन युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे.या अधिवेशनात परिसरातील जेवढ्या स्वयंसेवकांनी कार्य केले होते त्या सर्वांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व सर्वत्र प्रभाव गाजवत होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाने सारा भारत स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार होता. खान्देशातही चळवळ जोर धरू लागली होती. त्यातच धनाजी नाना चौधरी यांनी १९३० च्या कायदेभंग चळवळीत आपल्या फौजदारकीची नोकरी सोडून राष्ट्रसेवेस वाहून घ्यायची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी खिरोदा गावी स्वराज्य आश्रम स्थापन केला. त्याद्वारे गांधी विचारांचा त्यांनी प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात गावोगावी केला. याच दरम्यान या स्वराज्य आश्रमातील अनेक स्त्री-पुरुषांना इंग्रज सरकारने पकडून कारावास दिला. ही घटना १९३२ मध्ये घडली. या कारावासात पत्करलेल्या स्वातंत्र्यसैनिकात अग्रेसर धनाजी नाना व त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचाही सहभाग होता. याबद्दल सर्वत्र खान्देशात धनाजी नानांचे नाव चर्चेत राहिल.ेपुणे येथे महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे कार्यकारी मंडळ व महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांची २२ मे १९३६ ला बैठक पार पडली. त्यात शंकरराव देव यांनी खास करून खान्देशातील प्रभावी नेतृत्व म्हणून धनाजी नाना चौधरी यांची ओळख करून दिली. याच बैठकीत पुढील राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खेड्यात की शहरात यावर मोठी चर्चा झाली. खेड्यात अधिवेशन घेण्यासंदर्भात समर्थन प्राप्त झाले. त्यात जळगाव जिल्हा व सातारा या प्रमुख प्रांत आघाडीवर होते. त्यात जळगावकडे झुकते माप पडले कारण त्यापूर्वी १९३५ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व शंकरराव देव यांनी खान्देश दौरा केला असता फैजपूर येथे भव्य सभेचे आयोजन यावल, रावेर परिसरातील गावोगावी झालेले स्वागत तसेच देशभक्तीने भारलेले कार्यकर्ते पाहून हे दोन्ही नेते प्रभावित झाले होते. या दौºयाची सर्वस्वी जबाबदारी धनाजी नानांनी स्वीकारलेली होती.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण पहिले अधिवेशन फैजपूर येथे का भरले याबद्दल अण्णासाहेब दास्ताने यांनी हरिजन, या नियतकालिकात म्हटले, आमच्या धनाजी नानांचा त्याग अपूर्व आहे. त्यामुळे अधिवेशन फैजपूरला घेण्याची भाग्यरेषा ठळक झाली. २७, २८ व २९ डिसेंबर १९३६ रोजी अधिवेशन निश्चित झाले. शंकरराव देव स्वागत स्वागताध्यक्ष तर धनाजी नाना चौधरी यांची सरचिटणीस पदासाठी निवड करण्यात आली. याच अधिवेशनातून स्वराज्याची मागणी जोर धरू लागली. या अधिवेशनात अनेकांनी सहभाग नोंदवून फैजपूरचे नाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अजरामर केले आहे. यामुळे हे अधिवेशन चिरस्मरणात राहते.
स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवणारे फैजपूर काँग्रेस ग्रामीण अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 7:17 PM
फैजपूर येथे भरलेले पहिले काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील अधिवेशन होते व या अधिवेशनातच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होऊन त्यासाठी योजना आखण्यात आली व ती १९४२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खºया अर्थाने पूर्णत्वास आली. त्यामुळे फैजपूर अधिवेशनाला एक वेगळेच महत्व प्राप्त आहे व स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे असलेले योगदान कोणी विसरू शकणार नाही.
ठळक मुद्देहे अधिवेशन युवा पिढीसाठी प्रेरणा देणारेदौºयाची सर्वस्वी जबाबदारी धनाजी नानांनी स्वीकारलेली होती