ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 30 - गणेश रोड लगत एका घरात चालणा-या बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने मंगळवारी सकाळी सात वाजता छापा टाकून एक लाख 53 हजार 384 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज सदाशिव मांडगे (वय 42) हा आपल्या घरात ( क्र. 12829) अवैद्यरित्या परराज्यातून आणलेल्या मद्याकार्पासून बनावट दारु तयार करीत होता. याबाबत गुप्त माहितीवरुन नाशिक विभागाच्या निरीक्षक एम.बी. चव्हाण, एस.के. कोल्हे दुय्यम निरीक्षक वाय.एस. सावखेडकर, आर.आर. धनवटे, के.एन. गायकवाड, जी.जी. अहिरराव, आर.के. लब्दे यांच्या भरारी पथकाने पाळत ठेऊन मंगळवारी सकाळी सात वाजता छापा टाकला. यावेळी पथकाला मांडगे हा बनावट मद्य रिकाम्या बाटलींमध्ये भरतांना रंगेहाथ आढळून आला. उच्च प्रतीचे देशी - विदेशी ब?न्डचे मद्यही मिळून आले. बनावट मद्य भरालेल्या बाटल्यांना लावण्यासाठी आणलेले बनावट बुच यासह एक लाख 53 हजार 384 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. गुन्हा नोंदविण्या आला असून निरीक्षक एम.बी. चव्हाण करीत आहे.