आॅनलाईन लोकमतजळगाव : परतीच्या पावसाने रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एरंडोल व जामनेर तालुक्यात हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र त्यामुळे कापसासह शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे परतीच्या पावसाने वादळासह हजेरी लावली. सध्या सर्वत्र कापूस वेचणी सुरु आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसाने कापूस पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाºयाने संपूर्ण कपाशी तुर ज्वारी, तीळ जमीनदोस्त झाले आहे.एरंडोल येथे २० मिनीटे पाऊसएरंडोल येथे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास २० मिनीटे पाऊस झाला. रविवारी आठवडे बाजार असल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. विजांचा कडकडाट झाला. आॅक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काही वेळ झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला.सोयगावात मुसळधार पाऊससोयगाव तालुक्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. परतीच्या जोरदार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले. कपाशीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामाला या पावसाचा लाभ होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
एरंडोल व जामनेरला परतीचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 7:18 PM