या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील
दुर्गम भागातील गाड-या पाल येथील गुलाब शंकर बारेला हा डोंगरकठोरा येथील डॉ. राजेंद्र झांबरे यांच्याकडे शेतकामास होता. ३० मे रोजी बारेला पती-पत्नी शेतात शेतमजुरीसाठी गेले असता सकाळी ९ वाजताच्या सुमारास शंकर बारेला हा पत्नीस मी पाणी देऊन येतो असे सांगून गेला तर बराच वेळ परत न आल्याने पत्नीने शेतातच शोध घेतला असता शंकर बारेला हा निंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शेतमालक डॉ. झांबरे यांच्यासह पोलीस पाटील राजरत्न आढाळे व नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला असून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.