बोदवड :तालुक्यातील भानखेडा येथील गजानन शालीग्राम निकम (वय ३५ ) या तरुणाने सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली.गजानन हा बटाईच्या शेतात फवारणीसाठी रोजंदार घेउन फवारणीसाठी गेला असता रोजंदाराला फवारणी पंप भरुन देउन स्वत: काहीतरी विषारी द्रव्य प्राशन करुन त्यांने सकाळी ८ वजेच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच भानखेडा गावातील नागरीकांनी त्यास वरणगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने वरणगाव येथून भुसावळ येथील खासगी दवाखान्यात नेत असताना वाटेतच गजाननचा मृत्यू झाला. शवविच्छेदन वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैदकीय अधिकारी यांनी केले.गजानन निकम यांच्याकडे बैलांचा व्यापारी व इतर सावकारी असे ३ लाखा पर्यंत कर्ज होते. या कजाच्या वसुलीसाठी बैलांचा व्यापारी व वारंवार फोन करुन आमचे पैसे दे असा तगादा लावत होते तसेच भादली येथील बैलाचा व्यापारी याच्याकडे मयत गजानन निकम यांचे १ लाख ९० हजार रुपये घेणे होते, ते घेऊन दुसºता व्यापाºयाला द्यायचे होते असे मयत गजानन निकम यांच्या परिवाराकडुन कळाले. गजाननच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील असा परिवार आहे. या घटनेमुळे भानखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सावकारी कर्जाच्या जाचातून शेतकऱ्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 8:31 PM