खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : डोक्यावर सोसायटीचे व खाजगी कर्ज, न झालेली कर्जमाफी, मागील भीषण दुष्काळात लिंबू बाग सुकला. या खरिपात सुरवातीला पाऊस आला नाही. नंतर आला तो ओला दुष्काळ घेऊन आला. यामुळे उत्पन्नात मोठा फटका बसल्याच्या नैराश्यातून शिंदी, ता.भडगाव येथील भाऊसाहेब संतोष देवर े(वय ४५) या शेतकºयाने सोमवारी रात्री कोळगाव रस्त्यालगत एका शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले.देवरे यांचे तीन भावांचे एकत्रित कुंटुंब आहे. भाऊसाहेब यांनी वडिलांच्या निधनानंतर आपली दहा-पंधरा बिघे शेती व कुटुंब सांभाळले. काही वर्षांपूूर्वी विहीर, पाईपलाईन यात त्यांच्यावर कर्ज झाले होते. विहिरीला फारसे पाणी नव्हते. अशात मागील दुष्काळाने पेंडगाव रस्त्यालगतचा दीड- दोन एकरावरील लिंबू बाग सुकला. यावर्षी ओला दुष्काळ यामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा मावळल्याचे भाऊसाहेब देवरे मित्र व भाऊबंद यांचेकडे चिंता व्यक्त करीत असे. याशिवाय कर्जमाफीतदेखील ते बसले नाहीत. सोसायटीचे व खाजगी कर्जे कसे फेडणार? याशिवाय उपवर मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. यातूनच त्यांना नैराश्य आले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांंनी दिली.मंगळवारी शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.
शिंदी येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 9:33 PM
उत्पन्नात मोठा फटका बसल्याच्या नैराश्यातून शिंदी, ता.भडगाव येथील भाऊसाहेब संतोष देवर े(वय ४५) या शेतकºयाने सोमवारी रात्री कोळगाव रस्त्यालगत एका शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपविले.
ठळक मुद्देदुष्काळाच्या ओली-सुकीचा बळीकोरडा दुष्काळात लिंबू बाग सुकलाओल्या दुष्काळाने उत्पन्नावर पाणी फिरवलेकर्जमाफीही नाही यातून नैराश्य