पाचोरा- कर्जाचे ओझे सततचा दुष्काळ यास वैतागून गाळण बुद्रुक येथील शेतकºयाने विषारी द्रव्य प्राशन करून स्वत: च्या शेतात आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी मध्यरात्री घडली आहे. प्राप्त माहितीनुसार नाना नारायण बोरसे (वय ५५) या शेतकºयाकडे ८ एकर जमीन असून सततचा दुष्काळ असताना २ मुलींचे लग्न केले. यामुळे कर्जाचे ओझे वाढले. महिंद्रा फायनान्स,जनार्दन पतसंस्था, विकास सोसायटी व इतर खाजगी कर्ज याची परतफेड करणे शक्य न झाल्याने असहाय्य व वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी नाना बोरसे यांनी स्वत: च्या शेतात विषारी द्रव्य घेऊन रात्रीच्या वेळी बांधावरच आत्महत्या केली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, भाऊ असा परिवार आहे. ते अॅड. संदीप पाटील यांचे काका होत.
गाळण बुद्रुक येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 5:33 PM