जळगाव - डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या सुरेश भागवत पाटील (७७, रा. मनवेल ता. यावल) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.शनिवारी सकाळी ते शेतात गेले होते. सायंकाळी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी रविवारी सकाळी शेतात शोध घेतला असता त्यांंचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी विषाच्या बाटल्या आढळून आल्या.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पाटील यांच्यावर सेंट्रल बँकेचे तीन लाख रुपये कर्ज होते. गेल्या दोन-तीन वर्षापासून असलेली नापिकी, बाजारभावाप्रमाणे केळीस मिळत नसलेला भाव यामुळे मार्चअखेर बँकेचा कर्जाचा हप्ता कसा भरावा, या विवंचनेत ते होते. या चिंतेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
कर्जबाजारी शेतकऱ्याची यावल येथे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:59 PM