ऑनलाईन लोकमत
यावल, दि.26- सततची नापिकी, सोसायटीचे कर्ज, उपवर मुलीच्या लग्नाची काळजी यामुळे नैराश्य आल्याने तालुक्यातील डोंगरकठोरा येथील 52 वर्षीय शेतक-यांने शुक्रवारी त्यांच्या खळयातील निंबाचे झाडास गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शेतकरी कमलाकर भागवत वारके (वय 52) हे आर्थिक अडचणीत सापडले होते. शुक्रवारी पहाटे गुरांना चारा-पाणी करण्यासाठी जातो असे सांगून ते खळयात गेले होते. त्यांनी खळयातील निंबाचे झाडास गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात प}ी, एक मुलगा, एक मुलगी सुन असा परीवार आहे.