आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.१२- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ दिवाळीपूर्वी राज्यातील पात्र सर्व शेतकºयांना देणे अशक्य असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने शब्द खरा केल्याचे दर्शविण्यासाठी कर्जाच्या १ ते ६६ खात्यांचे लेखापरिक्षण पूर्ण झालेल्या अथवा होत आलेल्या जळगाव, नागपूर व चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफी देण्यात येईल, असे राज्य शासनाच्या मंत्र्यांकडून ठासून सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र दिवाळीपूर्वी पात्र १०० टक्के शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ देणे अशक्य असल्याचे निदर्शनास येत आहे. जळगाव जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या कर्जाच्या १ ते ६६ खात्यांचे सहकार विभागाच्या लेखापरिक्षण विभागातर्फे लेखापरिक्षण करण्याचे काम जवळपास संपुष्टात आले आहे. शुक्रवार, १३ आॅक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची खात्री संबंधीत अधिकाºयांनी व्यक्त केली. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीची आचारसंहिता असल्याने चावडी वाचन होऊ न शकलेल्या गावांव्यतिरिक्त उर्वरीत गावांमधील शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याची तयारी शासनाने चालविली आहे. तसेच राज्यातही जळगावचाच या खात्यांच्या लेखापरिक्षणात पहिला नंबर असून इतर जिल्ह्यात ६०-६५ टक्केच काम झाले असल्याचे समजते. नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांचे काम तुलनेने आघाडीवर असल्याने जळगावसह नागपूर, चंद्रपूर या तीन जिल्ह्यात प्राथमिक पात्र शेतकºयांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या जिल्ह्यांमधील उर्वरित पात्र श्ोतकरी व अन्य जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.
जळगावसह नागपूर, चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:26 PM
शासनाची धडपड: खाते आॅडीटचे जळगाव जिल्ह्यातील काम पूर्ण
ठळक मुद्देकर्जाच्या १ ते ६६ खात्यांचे लेखापरिक्षण पूर्णदिवाळीपूर्वी सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देणे अशक्यअन्य जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच कर्जमाफीचा लाभ