शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

शेतकरी कर्जमाफीसाठी चार रंगातील याद्या होणार प्रसिद्ध- तालुकास्तरीय समितीची भूमिका महत्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:33 PM

हिरव्या रंगाच्या यादीतील लाभार्थ्यांना मिळणार लगेच लाभ

ठळक मुद्देहिरवा, लाल, पिवळा व रंगहीन अशा चार रंगातील याद्या१०८ गावांमध्ये चावडी वाचन बाकीचावडीवाचनावर ३९६ आक्षेप

आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.१२- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाकडून अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांची माहितीची विशेष सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करून हिरवा, लाल, पिवळा व रंगहीन अशा चार रंगातील याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शासनाकडून कर्जमाफी दिली जाणार असली तरीही तालुकास्तरीय समितीची यात महत्वाची भूमिका राहणार आहे. दरम्यान शासनाकडून माहिती अपलोड करण्याच्या पद्धतीत सातत्याने बदल केले जात असल्यानेही विलंब होत आहे. तरीही जिल्ह्याची खातेनिहाय माहिती शुक्रवारपर्यंत पूर्णपणे अपलोड करण्याचा प्रयत्न सहकार खाते तसेच जिल्हा बँकेकडून सुरू आहे. तर व्यापारी बँकांकडून त्यांच्या खातेदारांची माहिती त्यांच्याच स्तरावर अपलोड केली जाणार असून त्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांना कळविली जाणार आहे. १०८ गावांमध्ये चावडी वाचन बाकी जिल्'ातील १२११ गावांमधील ४ लाख ५४ हजार ७४८ लाभार्र्थींसाठी ही चावडीवाचनाची प्रक्रिया केली जात आहे. त्यापैकी २०२ गावांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ती गावे वगळून उर्वरीत १०७३ गावांमध्ये चावडीवाचन घेण्यात येत आहे. त्यापैकीही १०८ गावांमध्ये अद्याप चावडी वाचन बाकी आहे. ज्या गावांमध्ये १७ तारखेला मतदान आहे. त्यांचे चावडीवाचन आचारसंहिता संपल्यावरच होणार आहे. या याद्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. त्याची सुनावणी होऊन त्यानंतर या याद्या जिल्हाधिकाºयांच्या सहीने अंतीम होऊन शासनाकडे जातील. सॉफ्टवेअरमध्ये योजनेच्या विविध अटी-शर्र्तींनुसार तपासणी होऊन पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्या शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. चावडीवाचनावर ३९६ आक्षेप आतापर्यंत पूर्ण झालेल्या चावडीवाचनावर ३९६ आक्षेप, सूचना उपविभागीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. या आक्षेपांवर सुनावणी होऊन नंतरच अंतीम यादी जाहीर होईल. हिरव्या यादीला मिळणार लाभ अपलोड झालेल्या खातेनिहाय माहिती तसेच आॅनलाईन भरलेला अर्ज यांची सांगड घालून शासनाकडील विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तात्पुरत्या पात्र शेतकºयांची यादी हिरव्या रंगात प्रसिद्ध केली जाईल. त्या यादीतील लाभार्थी शेतकºयांपैकी कुणावर चावडी वाचनात आक्षेप असतील तर त्या शेतकºयांनाची नावे राखून ठेवून उर्वरीत लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. पिवळ्या रंगातील यादीत अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नावे असतील. तर लाल रंगाच्या यादीत तात्पुरत्या अपात्र शेतकºयांची नावे असतील. रंगहीन यादीत कर्जमाफीसाठी विचाराधीन शेतकºयांची नावे असतील. तालुका समितीची भूमिका महत्वाची पोर्टलवर या याद्या उपलब्ध झाल्यावर त्यास विविध माध्यमातून जिल्हा व तालुकापातळीवर प्रसिद्धी दिली जाणार आहे. तसेच तीन दिवसांत विचाराधीन अर्जदारांची यादी वगळून उर्वरी याद्यांवर हरकती, सूचना जनतेकडून मागविल्या जाणार आहेत. तालुका समितीने या हरकती, सूचनांची चौकशी, खातरजमा करावयाची आहे. या समितीने तात्पुरत्या पात्र अर्जदारांच्या यादीतील अर्जदारांबाबतचा प्राथमिक पडताळणी अहवाल व इतर माहिती पडताळून अशा अर्जदारांना मंजुरी द्यायची आहे. ती यादी तालुका समिती पोर्टलवर अपलोड करेल. संबंधीत लाभार्र्थींनाही त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. त्या लाभार्थीना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल. एवढी प्रक्रिया जिल्'ात दिवाळीपूर्वी करण्याची धडपड प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी शासनाकडून व्हीडीओ कॉन्फरन्स घेऊन वारंवार सूचना केल्या जात आहेत. उर्वरीत रंगाच्या याद्यांबाबत तालुका समितीच खातरजमा करून निर्णय घेईल. त्यानुसार यादी पोर्टलवर अपलोड करणार आहे. तर उपविभागीय समिती ही यात अपिलीय समितीची व देखरेखीची भूमिका पार पाडणार आहे.