ऑनलाईन लोकमत
भडगाव,दि.18 - गरीबीमुळे मुलगा व नातवाच्या मदतीने शेतीची मशागत करणा:या निंभोरा येथील हिरामण पाटील या शेतक:यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्या शेतक:याकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मुंबई येथील एका रहिवाशाने 25 हजारांची मदत केली.
या शेतक:याला जिल्हा कृषी अधिका:याच्या मदतीने रतनलाल सी.बाफना यांच्या माध्यमातून 40 हजार रुपयाची बैलजोडी मिळाली होती. यानंतर मुंबईचे संदीप उभारे यांनी नुकतेच या शेतक:याचे घर गाठून 25 हजार रुपये रोख दिले. यातून त्यांनी लोखंडी गाडी व बैलासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. ‘लोकमत’ ने या शेतक:याची व्यथा मांडली होती हे वृत्त वाचून त्याच्यावर मदतीचा ओघ सुरु झाला आहे. 18 रोजी सकाळी बायर कंपनीचे मॅनेजर आर.एस.मराठे यांनी या शेतक:यास एक फवारणी पंप व औषधेही दिली आहे.
निंभोरा येथील शेतकरी हिरामण पाटील यांच्याकडे मागील आठवडय़ात मुंबई येथील वडाळा भागातील रहिवासी व बँकेत नोकरीस असेले संदीप पांडुरंग उभारे यांनी ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत निंभोरा गाव गाठले. त्यांचेसमवेत जितेश खैरे हे होते. हिरामण पाटील यांच्याशी उभारे यांनी चर्चा करुन 25 हजार रुपये रोख मदत देऊ केली. या पैशातून 17 रोजी लोखंडी गाडी आणण्यात आली. यावेळी युवराज पाटील, रामदास पाटील, मदन परदेशी वाडे, प्रदीप देसले, शरद पाटील निंभोरा, धनराज चौधरी मांडकी, राजेंद्र सोनवणे निंभोरा आदी उपस्थित होते.