मुक्ताईनगर : तालुक्यातील चांगदेव येथील तूर खरेदी केंद्र बंद असल्याच्या निषेधार्थ चिंचखेडा बुद्रूक येथील शेतकरी प्रदीप बाबूराव पाटील यांनी संताप व्यक्त करीत खरेदी केंद्राच्या गोडाऊनसमोरच मुंडण केले. त्यामुळे खळबळ उडाली. शासनाच्या नाफेड एजन्सीमार्फत चांगदेव येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता हे केंद्र बंदच आहे. 21 फेब्रुवारीपासून गोडाऊनला कुलूप आहे. शेतकरी रोज वाहनात तूर घेऊन येतात आणि परत जातात. गेल्या पंधरा दिवसांपासून हीच स्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतक:यांमध्ये संतापाची भावना आहे.दरम्यान, याबाबत माहिती घेतली असता, तूर खरेदी करून साठविण्यासाठी बारदान नसल्याने खरेदी थांबली आहे. चांगदेव तापी-पूर्णा शेती उत्पादक कंपनीतर्फे तूर खरेदी प्रक्रिया राबविली जात असताना खरेदी झालेल्या तुरीचे पैसेदेखील मिळत नसल्याची तक्रार शेतक:यांनी केली आहे. 5 हजार 550 रुपये भावाने खरेदीचा शासनाचा आदेश आहे. मात्र प्रत्यक्षात त्या भावात खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. खासगी व्यापारी तुरीला तीन हजार ते साडेतीन हजार रुपये भाव देत आहेत. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक शोषण होत आहे.प्रदीप पाटील यांनी तूर खरेदी केंद्राच्या गोडाऊनसमोर मुंडण केल्यावरदेखील संबंधित विभागाचा कर्मचारी, अधिकारी पाटील यांच्याकडे फिरकला नाही. तूर खरेदी केंद्राबाबत प्रदीप पाटील यांच्यासह राजेंद्र तुकाराम तायडे, संचीलाल तुकाराम वाघ, बाबू डहाके, राजेश हरी येवले, मधुकर नारायण पाटील, कमलाकर लक्ष्मण राणे, राजेंद्र गोपाल पाचपांडे, महादेव डिगंबर कुरकुरे, दिलीप नारायण भोळे, ज्ञानदेव लक्ष्मण राणे यांच्यासह अनेक शेतक:यांनी तक्रार केली आहे. (वार्ताहर)
तूर खरेदी केंद्र बंदच्या निषेधार्थ शेतक:याचे मुंडण
By admin | Published: March 07, 2017 12:38 AM