आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.२० - राज्य शासनाने ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी यांना हमीभाव जाहीर करून शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सकाळी सांगितले. जामनेर शेतकी संघामार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका, ज्वारी खरेदीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.गेल्या वर्षी शासनाने हमी भावाने भरडधान्याची खरेदी केली होती. यंदा देखील हमी भावाची खरेदी केंद्रे सुरु झाल्याने शेतकºयांना त्याचा लाभ होईल असे मंत्री महाजन यांनी सांगितले. शेतकी संघाचे उपाध्यक्ष बाबूराव गवळी, बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम, डॉ.सुरेश पाटील, रमेश नाईक, राजेश पाटील, दीपक चव्हाण उपस्थित होते. विक्रीसाठी मका आणणाऱ्या पहिल्या शेतकऱ्याचा टोपी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.३८ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटपउन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेतंर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत ३८ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. यासाठी ५० शेतकऱ्यांची निवड झाली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी कृषी अधिकारी सुरेश कुलकर्णी, पं.स.सभापती संगीता पिठोडे, जितू पाटील, नवल पाटील, प्रा.शरद पाटील, गोपाल नाईक, अण्णा पिठोडे उपस्थित होते.
ज्वारी,मका खरेदीमुळे शेतकऱ्यांना दिलासा - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:31 PM
जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ
ठळक मुद्देज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी यांना हमीभाव जाहीरकृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत ३८ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप विक्रीसाठी मका आणणाºया पहिल्या शेतकऱ्याचा टोपी व श्रीफळ देवून सत्कार