शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

शेतकरी हादरला...जळगाव जिल्ह्यातील 90 टक्के कापसाच्या क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 9:34 PM

कापसाचा हंगाम हातातोंडाशी आलेला असताना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्'ातील नव्वद टक्के कापसाच्या क्षेत्रावर हा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हादरला आहे.

ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे नाहीतहातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोयउच्च दर्जाच्या कापसाचे दर वधारले

 आॅनलाईन लोकमत

अजय पाटील,जळगाव-दि,२६-कापसाचा हंगाम हातातोंडाशी आलेला असताना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्'ातील नव्वद टक्के कापसाच्या क्षेत्रावर हा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हादरला आहे.

यंदा पावसाळा कमी झाल्याने शेतकºयांसमोर अडचणी आहेत. तसेच उडीद, मूग व सोयाबीनला देखील रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच आता बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांसमोर मोठेच संकट उभे ठाकले आहे.

नुकसानीचे पंचनामे नाहीतशासनाकडून अद्याप बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हव्या तशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. शेतकºयांकडून याबाबत कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील कृषी विभागाकडून लक्ष दिले जात नाही. प्रशासनाकडून मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यकाना जिल्'ातील बोंड अळी प्रादुर्भाव शेतांमध्ये जावून नुकसानीची माहिती घेवून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कृषी विभागाकडून  पंचनामे होत नसल्याने पंचनाम्यांची वाट  न पाहता शेतकºयांनीउभ्या पिकात नांगर फिरवला आहे.

बोंड अळीचे आक्रमणबोंड अळी रोखण्यासाठी जिल्'ातील शेतकºयांनी बीटी बियाण्याचा वापर केला. सुरुवातीला त्याचा चांगला परिणाम दिसला. कापसाचे उत्पन्न वाढले. तसेच शेतकरी गेल्या काही वर्षांपासून याच बियाण्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे कालांतराने बीटी टू बियाण्यांवरही अळीचा प्रादुर्भाव होवू लागला, यंदा ही परिस्थिती शेतकºयांचा हाताबाहेर गेली असून, शेतकºयांना आपला कापूस उद्ध्वस्त करावा लागत आहे. यंदा बीटी थर्ड बियाणे बाजारात आणण्याची आवश्यकता होती. मात्र या बियाण्याला शासनाने परवानगी नाकारल्याने बीटी टू हेच बियाणे शेतकºयांना वापरावे लागले असल्याची माहिती काही कृषी तज्ज्ञांनी दिली.

चार लाख हेक्टरवर प्रादुर्भावजिल्'ात एकूण साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यापैकी चार लाख हेक्टर जमिनीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे. नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे  ५० टक्के कापूस वेचला जात असतो. तर उर्वरित ५० टक्के उत्पन्न शेतकºयांचे बोंड अळीमुळे वाया जात आहे. अनेक भागांमध्ये हा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या व दुसºया आठवड्यातच वाढल्याने अनेक शेतकºयांचे ६० ते ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. उच्चप्रतीच्या औषधांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येऊ शकली नाही. त्यामुळे हताश शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडत आहेत.

भविष्यात बोंड अळी टाळता येण्यासाठीचे उपाय१.यंदा बोंड अळीचा प्रादुर्भाव जरी आटोक्यात येवू शकला नसला तरी, भविष्यात हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकºयांनी सध्याचे कापसाचे पीक काढून खोल नांगरणी करून घ्यावी.२.  सुधारित बियाणांचा वापर करावा. तसेच कापसाच्या पिकावर पुन्हा कापूस न लावता एक पेºयासाठी पीक बदलून घ्यावे असा सल्ला जि.प.चे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिला आहे.

उच्च दर्जाच्या कापसाचे दर वधारलेबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांकडून कापूस नष्ट केला जात आहे. यामुळे फरदड कापूस येण्याची शक्यता नाही. तसेच कोरडवाहू शेतकºयांचे बोंडअळी व कमी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. चांगला दर्जाचा कापूस आपल्याला शेतकºयांकडून मिळावा यासाठी जिनिंग व्यवसायिकांकडून कापसाच्या दरात शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ केली आहे. उच्च दर्ज्याचा कापसाला प्रती क्विंटल ४ हजार ६०० ते ४ हजार ६५० इतका दर दिला जात आहे.

कोट..बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने जिनिंग मध्ये येणाºया कापसाची आवक कमी झाली आहे. तसेच जो माल येत आहे. त्यामध्ये कापसाचा दर्जा खराब आहे. त्यामुळे  उच्च दर्जाच्या  कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.-प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन

खराब हवामानामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला.  त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता न आल्याने बोंड अळीचे आक्रमण रोखता आले नाही.त्यामुुळेच कापसाचे पीक नष्ट करण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. याबाबत लवकरच पंचनामे करण्यात येणार आहेत.-मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी

यंदा आधीच शेतकºयांना कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे फटका बसला आहे. त्यातच कापसाचा हमीभाव कमी असताना  शेतकरी जेमतेम कापूस विक्री करून पुढील हंगामाच्या तयारीला लागणार होता. मात्र बोंड अळीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने याबाबत तत्काळ पंचनामे करून मदत करण्याची गरज आहे.-दीपक मंगल पाटील, शेतकरी, आव्हाणे

कापसाच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. बोंड अळीचा परिणाम झाला आहे, तरी शेतकºयांना प्रती क्विंटल ४ हजार ५०० इतका भाव दिला जात आहे. मात्र काही व्यापाºयांकडून दर वाढविण्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे शेतकºयांची फसगत होण्याची शक्यता आहे.-लक्ष्मण पाटील (लकी टेलर), जिनिंग व्यावसायिक

बाजारात कापासाचे भाव मोठ्या प्रमाणात नव्हे तर प्रती क्विंटल १०० ते १५० रुपयांनी वधारले आहेत. हे दर केवळ चांगल्या दर्जाच्या कापसासाठीच आहे. बोंड अळीमुळे उत्पन्न कमी होण्याचा भितीनेच हे दर वाढविले गेले आहेत.-प्रकाश नारखेडे, जिनिंग व्यावसायिक