आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१८ : तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील शेतकरी धनराज भावराव मोरे (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी दुपारी अडीच वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.धनराज मोरे हे घरात एकटेच होते. मुलगी दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी पाणी पिण्यासाठी आली होती. त्यानंतर तिला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. मुलीने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबिय देखील शेतातून परत आले. शेजाऱ्यांनी धनराज याला जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र याठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयत धनराज यांच्यावर सोसायटीचे एक ते दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडे साडे चार एकर कोरडवाहूू शेती होती. या वर्षी शेतातील पुरेस उत्पन्न उत्पन्न न आल्याने त्यांनी आत्महत्या केली. धनराज याचा पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोयखेडा दिगर येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:17 PM
मोयखेडा दिगर येथील शेतकरी धनराज भावराव मोरे (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी दुपारी अडीच वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देकर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्यावडिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने मुलीने केली आरडाओरडशेतातील पुरेस उत्पन्न उत्पन्न न आल्याने केली आत्महत्या