निपाणे, ता. एरंडोल (जि. जळगाव)- येथून जवळच असलेल्या पिंप्रीसिम येथील शेतकरी विरेंद्रसिंग लालसिंग पाटील (वय ३२) यांनी दिनांक २१ रोजी दुपारी १ वाजता स्वत:च्या शेतात कीडनाशक सेवन करुन आत्महत्या केली. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचाही लाभ न मिळाल्याने निराश झाल्याने पाटील यांनी आत्महत्या केली, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.मागील तीन वर्षांपासून महागडे बि -बियाणे शेतात टाकून मजुरी देखील निघाली नाही. यामुळे पाटील हे खूपच अडचणीत आले होते. याचबरोबर शासनाने शेतकऱ्यांना जी कर्ज माफी जाहीर केली त्याचाही त्यांना लाभ मिळाला नाही. विरेंद्रसिंग पाटील हे नेहमी कर्जांच्या चिंतेत राहत होते. यावर्षी देखील जमीन नापीक झालेली दिसत होती. यामुळे नेहमी विचारात असलेल्या विरेंद्रसिग यांनी बुधवारी शेतात गेल्यावर कपाशी पिंकावर फवारणी करावयाचे कीटकनाशक सेवन केले. घरालीचइतर व्यक्तींना ते काही वेळातच जमिनीवर पडलेले दिसले. खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला नोंद केली आहे.विरेंद्रसिंग पाटील यांच्या पश्चात आई , वडील ,पत्नी , १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने आता कुटुंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. तरी शासनाने त्यांच्यावरील पिक कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.