ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.9 - कर्जमाफीच्या निर्णयावर राज्यातील शेतकरी समाधानी आहे काय व शेतक:यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 12 जुलै रोजी जळगाव जिल्हा दौ:यावर येत असून धरणगाव व पारोळा येथे त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आर. ओ. पाटील, दिलीप भोळे, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, कुलभूषण पाटील, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेची जिल्हा बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौ:याच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले.
उद्धव ठाकरे हे 12 रोजी सकाळी 11.30 वाजता जळगाव विमानतळावर पोहोचतील. 11.45 वाजता पाळधी येथे शेतक:यांशी ते संवाद साधतील. दुपारी 12 वाजता त्यांची धरणगाव येथे सभा होईल. यानंतर दुपारी 1.30 वाजता पारोळा येथे सभा होईल. कर्जमाफी, दहा हजाराची मदत ही मुख्यमंत्र्यांची घोषणा हास्यास्पद असल्याची टीका या वेळी आमदार किशोर पाटील यांनी केली.
सोमवारी जिल्हा बॅँकेवर ढोल बजाओ आंदोलन
शासनाने दिलेल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी अद्याप जिल्हा बॅँक तसेच राष्ट्रीयकृत बॅँकांनी केली नाही. कर्जमाफी कुणाला याच्या याद्या बॅँकांनी लावल्या नाहीत. याच्या निषेधार्थ 10 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक तसेच स्टेट बॅँक मुख्य शाखेसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्यावतीने पत्रपरिषदेत देण्यात आली. पक्षाचे आमदार, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होतील.
आमदार किशोर पाटील जिल्हा बँकेसमोर ढोल वाजविणार काय? असे विचारले असता ते म्हणाले. तेथे मी पदाधिकारी असलो तरी आंदोलनात शिवसैनिक म्हणून सहभागी होईल शासनाच्या धोरणाविरोधात ढोल वाजवेल.
25 ला गौप्यस्फोट होईल
शिवसेना जुलै महिन्यात गौप्यस्फोट करणार, असे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. या घोषणेबाबत विचारले असता हा गौप्यस्फोट 25 जुलैला निश्चित होईल, असे चिमणराव पाटील व आर.ओ.पाटील म्हणाले.