जळगाव,दि.18- शेतमालाला योग्य भाव न मिळणे त्यातच कर्जाचा डोंगर या सा:याला कंटाळून वाकडी, ता.जळगाव येथे धोंडू देविदास हटकर (वय 38) या शेतक:याने मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता शेतातच विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
धोंडू यांच्या वडिलांनी सोसायटीचे पीक कर्ज काढले असून ते थकीत आहे. कोरडवाहू शेती असल्याने उत्पन्न जेमतेमच होते. त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडणे जिकरीचे झाले होते. मंगळवारी सकाळी शेतात जाताना धोंडू हटकर यांनी किटकनाशक औषध बाटलीत आणले होते. धोंडू यांनी विष प्राशन केल्याचे समजताच पोलीस पाटील विठ्ठल पाटील व गावक:यांनी त्यांना तातडीने रिक्षातून जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वाटेतच त्यांचा प्राणज्योत मालवली होती.