संजय पाटीलअमळनेर, जि. जळगाव : पावसाने सुरुवातीचे दोन महिने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न हातचे गेल्याने, नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन क्षमता ही ५० टक्के पेक्षा खूपच कमी दिसून आल्याने तालुक्यातील आठही मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भारतीय एक्सा विमा कंपनीला दिले आहेत.संपूर्ण अमळनेर तालुक्यात सुरुवातीचे दोन महिने पाऊस न पडल्याने पिके वाढली नाहीत, कालमर्यादा संपली होती, उत्पन्न हातचे गेले होते. त्यामुळे पीक विमा मिळावा म्हणून तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दोनवेळा स्वतंत्र पथके पाठवून पीक पाहणी केली होती. त्यात गेल्या सात वर्षातील कापसाची सरासरी कापूस उत्पादकता किलो मध्ये प्रति हेक्टरी ग्राह्य धरून नजर अंदाजानुसार यावर्षी पावसाअभावी अथवा खंड पडल्याने किती येऊ शकतो याची पाहणी करण्यात आली. त्यात आठही मंडळात अपेक्षित उत्पन्न हे ५० टक्के पेक्षा खूप कमी येत असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्रगत शासन नियमानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदरची जोखीम ही बाधित अधिसूचित क्षेत्रातील कापूस पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानन्तर पीक हंगामाच्या अखेरीस उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहील. आगाऊ रक्कम नुकसान भरपाईत समायोजित करण्यात येईल.
तालुक्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली असून त्यातील ५० टक्के म्हणजे १५ हजार २६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. हेक्टरी ४० हजार पीक विमा संरक्षित रक्कम असल्याने त्यांच्या २५ टक्केम्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये मिळतील.- भारत वारे , तालुका कृषी अधिकारी , अमळनेरजिल्हाधिकारींनी पथकांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे सात वर्षातील सरासरीच्या ५०टक्के उत्पादकता किलो मध्ये प्रतिहेक्टर व अपेक्षित उत्पादकता किलोमध्ये प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणेमंडळ ५०टक्के अपेक्षित उत्पादकता उत्पादकताअमळगाव ३८३.४ ११५.०अमळनेर ४०९.२ ९८.२भरवस ३७२.० ७४.४मारवड ४२२.७ १०९.९नगाव ३६९.६ ९६.१पातोंडा ३९१.८ ११७.५शिरूड ३२५.६ १३६.७वावडे ३७०.५ १४०.८