मुक्ताईनगर : तालुक्यात केळीवर आलेल्या रोगामुळे केळी उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी अंतुरली येथील बहुतांशी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपली केळी उपटून फेकली.याप्रसंगी शासनाकडे ५० हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात शेतकरी अनिल वाडीले, अशोक सपकाळ, प्रल्हाद धायले, शेख भैया, अनिल दूट्टे , कन्हैया मोकासे, गोपाळ पाटील, नीलेश बारी, संजय सोनवणे, अनिल पारख, सतीश सपकाळ, रमेश पारख आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केळी पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच तत्काळ शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. एवढेच नव्हे तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत कॅबिनेट बैठकीत हा विषय घेत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याकामी नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याचे आदेश केलले. याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचेदेखील या शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.
अंतुर्ली येथील शेतकऱ्यांनी उपटून फेकली केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 12:17 PM