उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : उटखेडा येथील शेतकºयांना पीक विम्याची भरपाईची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.तीन महिन्यांपूर्वी पीक विमा लाभार्र्थींची यादी बँकेला प्राप्त झाली होती. मात्र यादीत शेतकºयांचे नाव, क्षेत्रफळ, गावाचे नाव अशा चुका आढळल्या होत्या. त्यामुळे या यादीची तपासनी व चुका दुरूस्त करण्यासाठी परत पाठवण्यात आली. परंतु आजपर्यंत यादी दुरुस्त होऊन आलीच नाही. या यादीची माहिती शेतकºयांना मिळत नसल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत.दीर्घकाळ प्रतीक्षा करूनदेखील नुकसानग्रस्त शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. शेतकºयांनी बँकेतील कर्मचाºयांना विचारणा केली. मात्र पीक विम्याचे पैसे न आल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. चार ते पाच दिवसात शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळतील, असे आश्वासन बँकेतील कर्मचारी देत आहेत. यापूर्वीही अनेक आश्वासने शेतकºयांना देण्यात आली होती, अशा खोट्या आश्वासनामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:02 PM
उटखेडा येथील शेतकºयांना पीक विम्याची भरपाईची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
ठळक मुद्देरावेर तालुक्यातील उटखेडासह परिसरातील शेतकऱ्यांची दैनाबँकेचे उंबरठे झिजवल्यावर यंत्रणा म्हणते, ‘अजून पैसे आले नाही’दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही नुकसानग्रस्तांना पीक विम्याचा लाभ नाही