ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - येत्या 1 जूनपासून शेतकरी संपावर जातीलच. बाजार समित्या बंद ठेवल्या जातील. दूधपुरवठा शहरे, डेअ:यांमध्ये विक्री न करता गावातच त्याचे वितरण, विक्री होईल. तसेच शेतकरी आपल्या कुटुंबापुरतेच या खरीपात पिकवतील, असा ठाम निर्धार शनिवारी किसान क्रांती कृती समितीच्या बैठकीत शनिवारी दुपारी झाला. नूतन मराठा महाविद्यालयात ही बैठक झाली. त्यात या समितीचे प्रवर्तक एस.बी.पाटील, मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डी.डी.बच्छाव, शेतकरी संघटनेचे विभागीय समन्वयक कडूजी पाटील, जगतराव पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, दगडू शेळके, शिव व्याख्याते संजीव सोनवणे, महेमूद बागवान आदी उपस्थित होते. विधानसभा व इतर ठिकाणी मुख्यमंत्री यांनी कजर्मुक्तीची घोषणा केली, पण मुख्यमंत्री ही घोषणा पूर्ण करतील का, असा प्रश्न एस.बी.पाटील यांनी उपस्थित केला. संपात जिल्हाभरातील सर्व तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहीले. या संपाचे स्वरुप व्यापक होत असून, त्यात हजारो शेतकरी सहभागी होतील. बाजार समित्या बंद करण्यासाठी सभापतींना निवेदने दिली जातील. व्यापा:यांचा पाठींबा संपासाठी घेतला जाईल. तसेच अधिकाधिक शेतक:यांचा सहभाग यात करून हा संप यशस्वी करण्याचा निर्धार झाला. विरोधक संघर्षयात्रेद्वारे शेतक:यांसाठी रस्त्यावर आले, पण हेच विरोधक सत्तेत असताना शेतक:यांसाठी पूरक निर्णय घेतले नाहीत. त्यांच्या काळातही शेतक:यांचे हाल झाले. हे विरोधक रुदाली चित्रपटातील नाटय़मय रडणा:या अभिनेते, अभिनेत्रींसारखे दिसतात, अशी टीका एस.बी.पाटील यांनी केली. या वेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून वसंत पाटील, उमेश पाटील, दिलीप पाटील, अजित पाटील, प्रेमराज खडके, पंडीत आटाळे, संजीव बाविस्कर, भिमराव पाटील, गणेश पाटील, किरण सपकाळे, संजय चौधरी, रविराज पाटील, गोकूळ बोरसे, संतोष पाटील, प्रवीण मोरे, आर.जे.पाटील, पुरूषोत्तम पाटील, सुरेश पाटील, भाऊसाहेब पाटील, नवनीत पाटील, सुभाष ठाकरे, राजू चौधरी, व्ही.एस.पाटील, दत्तात्रेय पाटील, सचिन पवार आदी उपस्थित होते.
शेतकरी 1 जूनच्या संपावर ठाम
By admin | Published: May 20, 2017 5:33 PM