जळगाव : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची २५ रोजी बैठक होऊन यात मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या १७ प्रकरणांपैकी १३ प्रकरणे मंजूर करण्यात आली. चार प्रकरणे अपात्र ठरविली आहे.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कृषी विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.पात्र प्रकरणे : किशोर दगा जाधव (तांबोळे बु., ता.चाळीसगाव), गणेश बाळासाहेब देशमुख (देशमुखवाडी, ता.चाळीसगाव), प्रमोद रामराव पाटील (बोरखेडे बु., ता.चाळीसगाव), भगवान त्र्यंबक पाटील (कुंझर, ता.चाळीसगाव), भरत सदाशिव पाटील (पाळधी, ता.धरणगाव), लक्ष्मण ओंकार पाटील (कढोली, ता.एरंडोल), शरद ओंकार पाटील (मराठे, ता.चोपडा), राजघर बुधा चौधरी (जळोद , ता. अमळनेर), संदीप भाऊसाहेब पाटील (खर्दे, ता. अमळनेर), धनराज बादशाह मोरे (कनाशी, ता.भडगाव), योगेश प्रेमराज चौधरी (फुफनगरी, ता.जळगाव), छगन सदाशिव सोनवणे (सूजदे, ता.जळगाव), विश्वास प्रताप पाटील (वराड बु., ता.धरणगाव).
शेतकरी आत्महत्येची १३ प्रकरणे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:00 PM