ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - राज्य शासनाने कजर्माफी जाहीर केली आहे. ही कजर्माफी करताना कोणावरही अन्याय होवू नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीर्पयत पात्र शेतक:यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होवून शेतक:यांची दिवाळी गोड होणार, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी सकाळी शहरातील कांताई सभागृहात झाला़. यावेळी ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खान्देशातील 25 शेतक:यांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले.
गिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्राचे नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने आता महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षात मोठय़ा प्रमाणावर हे काम झालेले असेल. यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत होईल.
शेती परवडत नाही, असा गैरसमज शेतीबद्दल आहे. परंतु मेहनत, तंत्रज्ञान व नियोजन याची सांगड घातली तर कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळते. हे अनेक शेतक:यांनी दाखवून दिले आहे. एकरी एक ते पाच लाख उत्पन्न शेतकरी घेतात.
विजेच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन शेतक:यांना लवकरच 5 लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उज्रेने जोडणात येणार आहे. शेतक:यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जात आहे. तसेच राज्यात जलसंधारणाची कामेही मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात जिल्ह्यासह राज्यातील अनेक धरणांची कामे पूर्ण झालेली दिसतील अशी ग्वाहीही गिरीश महाजन यांनी दिली.