यावल : बाजार समितीकडून केळी खरेदीचा परवाना नसताना सातोद व कोळवद येथील सात केळी उत्पादकांकडील केळी खरेदी करून त्यांची 18 लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी (सावदा) व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद फिरके (कोळवद) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यावल बाजार समितीचे सचिव स्वपAील सोनवणे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. बाळू पुंडलिक साळी व जयवंत प्रल्हाद फिरके यांनी सातोद व कोळवद येथील सात शेतक:यांकडून मार्च ते मे 2016 या काळात केळी खरेदी केली होती. ही केळी खरेदी करताना त्यांनी बाजार समितीचा परवाना घेतला नाही. त्यामुळे शेतक:यांची 17 लाख 99 हजार 223 रुपयांत फसवणूक केली आहे. सातोद व कोळवद ही गावे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात. याबाबत शेतक:यांनी दिलेल्या तक्रारीवरून 25 नोव्हेंबर 2016 रोजी संबंधित व्यापा:यास नोटीस बजावण्यात आली होती. शिवाय रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापारी असल्याने रावेर बाजार समितीतर्फेही दप्तर तपासणीस उपलब्ध करून देण्याबाबत लेखी कळविण्यात आले होते, मात्र संबंधितांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 406, 417, 420 सह 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक अहिरे व संजय तायडे पुढील तपास करीत आहेत. सातोद व कोळवद येथील फसवणूक केलेल्या शेतक:यांची रक्कम अशी आहे. तेजेंद्र वारके 4 लाख 45 हजार 933 रुपये, किरण पाटील 4 लाख 71 हजार 933 रुपये, हेमंत पाटील 3 लाख 36 हजार 796, हिरालाल सावळे 2 लाख 69 हजार 677, देवेंद्र पाटील 9 लाख 22 हजार 220 रुपये, किशोर पाटील 97 हजार 664 रुपये, रमाकांत महाजन 55 हजार अशी एकूण 17 लाख 99 हजार 223 रुपयांची फसवणूक केली.
शेतक:यांची फसवणूक
By admin | Published: April 04, 2017 1:21 AM