जळगाव : तालुक्यातील आव्हाणे शिवारातील सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकºयांनी आणलेला माल खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शुक्रवारी आक्रमक झालेल्या शेतकºयांनी खरेदी केंद्रासमोर तीन तास ठिय्या आंदोलन पुकारले. तसेच जोपर्यंत शेतकºयांकडून कापूस खरेदी केली जाणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्रावर ठिय्या आंदोलन सुरुच राहिल अशी भूमिका शेतकºयांनी घेतली. तब्बल तीन तास आंदोलन सुरुच राहिल्याने सीसीआयच्या अधिकाºयांनी शेतकºयांचा कापूस खरेदी केला.सीसीआयचे केंद्र सुरु झाल्यापासूनच त्यांच्या आडमुठे धोरणाचा फटका कापूस उत्पादक शेतकºयांना बसत आहे. सुरुवातीला कापसात ओलावा असल्याचे कारण देत हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला. तर आता कापसात कवडीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत कापूस खरेदीला नकार देत आहेत. मात्र, एकीकडे शेतकºयांचा मालाला नकार देणाºया सीसीआय प्रशासनाकडून व्यापाºयांकडील माल मात्र खरेदी केला जात आहे. शुक्रवारी आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर काही शेतकरी आपला कापूस विक्री करण्यासाठी आल्यानंतर सीसीआयच्या अधिकाºयांनी कापूस खरेदी बंद केली असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी व्यापाºयांनी आणलेला कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांनी यावर आक्षेप घेत. शेतकºयांकडील कापूस खरेदी करावाच लागेल अशी भूमिका घेतली. मात्र, सीसीआयने नकार दिल्याने जिनींगसमोरच शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी सुकदेव चौधरी, भगवान पाटील, जितेंद्र चौधरी, नवल चौधरी, कैलास चौधरी, जनार्धन चौधरी आदी उपस्थित होते.अधिकारी व शेतकºयांमध्ये वादशेतकºयांनी ठिय्या आंदोलन पुकारल्यानंतर काही अधिकाºयांनी शेतकºयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत माल खरेदी करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू अशी ठाम भूमिका शेतकºयांनी घेतली. यावेळी सीसीआयचे अधिकारी व शेतकºयांमध्ये वाद देखील झाला. शेतकरी आंदोलनावर ठाम असल्याने अधिकाºयांनी केंद्रावरून काढता पाय घेत. कार्यालयात जावून बसले. तब्बल तीन तास शेतकºयांचे आंदोलन सुरुच होते. त्यानंतर शेतकºयांनी यासंदर्भात सीसीआयच्या अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. काही वेळातच सीसीआयने सर्व शेतकºयांचा माल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतकºयांनी आपले आंदोलन मागे घेतले.व्यापारी आणि सीसीआयची मिलीभगतसीसीआयने अचानक ३१ जानेवारीपासून खरेदी थांबवली आहे. सीसीआयच्या केंद्रावर शेतकºयांना हमीभाव मिळत असतो. अचानक खरेदी थांबविल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव खासगी जिनर्स व व्यापाºयांकडे माल विक्री करावा लागतो. त्याठिकाणी हमीभावापेक्षा तब्बल ५०० ते ६०० रुपये कमी दराने शेतकरी कापूस विक्री करतो. त्यानंतर शेतकºयांकडून खरेदी केलेला माल व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर आणतात. शेतकºयांकडून ४६०० रुपये प्रतिक्विंटल घेतलेला माल या केंद्रावर व्यापारी ५ हजार ते ५१०० पर्यंतच्या भावात विक्री करतात. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतक ºयांचा सातबारा उतारा, आधारकार्ड ही कागदपत्रे लागतात. व्यापारी दुसºयाच शेतकºयांचा कागदपत्रांवर कापूस सीसीआयला विकून लाखो रुपये कमवत आहेत. अनेक व्यापारी बडे शेतकरी आहेत. ते छोट्या शेतकºयांची पिळवणूक करत आहेत.शेतकºयांचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सीसीआयच्या अधिकाºयांना शनिवारी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकºयांना देखील बोलावले आहे. शेतकºयांचा माल हा खरेदी करायलाच हवा.-गुलाबराव पाटील, पालकमंत्रीव्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांचे साटेलोटे आहे. शेतकºयांचा मालाला खरेदी न करण्यासाठी प्रतवारीचे कारणे पुढे केले जातात. मात्र, व्यापाºयांचा माल सरसकट कोणतीही प्रतवारीचे निकष न लावताच खरेदी केला जातो. हे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. आता शेतकºयांचा माल खरेदी केला नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करु.-अॅड. हर्षल चौधरी, शेतकरी
शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक तर व्यापाऱ्यांना पायघड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:09 PM