जळगाव : अवकाळी पावसामुळे बाधित पीक पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ.सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार दीना नाथ यांचे पथक दोन दिवस जिल्हा दौºयावर आले होते. त्यांनी शनिवारी सकाळी जळगाव तालुक्यातील शिरसोली, पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे, भडगाव तालुक्यातील भोरटेक तर चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी शेतकºयांनी या पथकासमोर आपल्या व्यथा मांडल्या.या पथकासमवेत नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आदी अधिकारी उपस्थित होते.पथकाने खेडगाव नंदीचे, ता.पाचोरा येथील शेतकरी कांताबाई तेजमल संघवी यांच्या नुकसान झालेल्या मका पिकाची, भोरटेक, ता.भडगाव येथील शेतकरी हिंमतराव त्र्यंबकराव शितोळे यांच्या तूर व ज्वारी पिकाची, तर हिंगोणे खुर्द, ता.चाळीसगाव येथील शेतकरी अरविंद भीमराव पाटील यांच्या शेतातील ज्वारी पिकाची पाहणी केली.यावेळी डॉ. सुभाष चंद्र यांनी सांगितले, की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच त्यांनी पाहणी केलेल्या शेतकºयांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाºयांना माहिती देताना शेतकºयांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. कपाशीच्या आतापर्यंत तीनवेळा वेचणी झाली असती, परंतु पावसामुळे वेचणीतर नाहीच पण उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची विनंती केली.तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. पिकांचे जिल्ह्यातील सहा लाख ४१ हजार ३४५ शेतकºयांचे सात लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या भरपाईसाठी सन २०१९-२० मध्ये ८१२ कोटी २९ लाख रुपयांची आवश्यकता आहे. शासनाकडून १७९ कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. अद्याप ६२२ कोटी २२ लाख रुपये मदतीची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 5:40 PM
अवकाळी पावसामुळे बाधित पीक पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ.सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार दीना नाथ यांचे पथक दोन दिवस जिल्हा दौºयावर आले होते.
ठळक मुद्दे केंद्रीय पथकाकडून पिकांच्या नुकसानीची पाहणीपीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल