या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष
अभिमन राघो हाटकर, तालुका सल्लागार विजय दोधा पाटील, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, शहराध्यक्ष भगवान चौधरी, शहर उपाध्यक्ष मनोज परदेशी, जाकीर कुरेशी, विलास पाटील, सदस्य अशोक पाटील, उमेश धनगर, योगेश धामोरे, सुभाष ठाकरे, शांताराम पाटील, अशोक भदाणे, शिवाजी पाटील, अनिल पाटील यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आम्ही भडगाव तालुक्यातील शेतकरी, आम्हाला येणारे वीज बिल शंभर टक्के भरण्यास आम्ही तयार आहोत; परंतु आम्हाला दिवसातून ७ तास सुरळीत वीजपुरवठा द्यावा. पावसाळ्यात ४ महिने आमचे वीज पंप बंद असतात. उन्हाळ्यात आमच्या विहिरी कोरड्या असतात. तरीही आम्हाला वीज बिल तेवढेच येते. आमच्या शिवारातील इलेक्ट्रिक डीपीचा देखभाल खर्च कंपनीने स्वत: करायला हवा. डीपीवरील फ्यूज कंपनीने बदलावा. कारण ती कंपनीची जबाबदारी आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. ट्रान्सफाॅर्मर शाॅट झाला, प्यूज खराब झाला, या सर्वांसाठी शेतकऱ्यांना वर्गणी जमा करून दुरुस्तीचे काम करावे लागते, अशी वेळ शेतकऱ्यांवर यायला नको, हे काम वीज कंपनीचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.