उटखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : ‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे. या प्रचंड तापमानामुळे केळी बागांना पाणीटंचाईसह नुकसानीचा मोठा फटका बसत आहे.केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत प्रचंड धडपड करताना दिसत आहेत. केळीचे घड परिपक्व होण्यापूर्वीच निसटण्यामुळे शेतकरी नुकसानीने संकटात सापडूनही सामना करीत आहे. केळी बागांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी बागांना समोरून व बाजूला ग्रीनशेड नेटचा आडोशासाठी वापर करताना दिसत आहेत.केळी बागांना शेतकरी संरक्षणासाठी विविधरंगी आकर्षक साड्यांचा वापर करताना दिसत आहे . सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून, उन्हाचा तडाखा व लग्न सोहळयांचा धूमधडाका सहन करावा लागत असून पाणीटंचाईमुळे केळी बागा वाचविण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करीत आहे. उटखेडा, भातखेडा, कुसुंबा, मुंजलवाडी, कुंभारखेडा या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरी हाजारो रुपये खर्च करून विहिरींत आडवे व उभे बोअर करुन केळी बागा वाचविण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओततांना दिसत आहे.वीज समस्येशी शेतकºयांना सामना करावा लागत आहे. एक सप्ताह दिवसा व एक सप्ताह रात्र अशी वेळ असून दिवसाला आठ तास तर रात्रीला दहा तासच वीज शेतीसाठी मिळत आहे. मे महिन्यात तापमानाचा फटका केळी बागांना नुकसानीचा ठरत आहे. त्यात उष्ण वाºयाचा वेग त्यामुळे केळी बागांचे नुकसान होताना दिसत आहे. केळी बागाच्या संरक्षणासाठी व तापमानापासून वाचविण्यासाठी ग्रीनशेड नेट, गीनी ग्रास तसेच विविध रंगी साड्यांचा वापर केळी बागांच्या समोरच्या बाजूला लावून शेतकरी धडपड करताना दिसत आहे.
केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 3:42 PM
‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी उन्हामुळे घड निसटण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागामध्ये उन्हाच्या पाºयाने गाठली पंचेचाळीशीपरिपक्क झालेल्या केळी बागायतीवर उन्हाचा परिणामहातातोंडाशी आलेली केळी उन्हापासून वाचविण्यासाठी शेतकºयाची धडपड