जळगाव : पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील सोनूसिंग रामसिंग पाटील (वय-३४) या शेतकºयाने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ दरम्यान, अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़सोनूसिंग पाटील हे नाचणखेडा येथे पत्नी, दोन मुले आणि एका मुलीसह वास्तव्यास होते़ शेती करून घराचा उदरनिर्वाह करायचे़ सोमवारी सकाळी घरातील कुटूंबीय शेतात कामासाठी गेले होते़ त्यामुळे सोनूसिंग व त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा असे दोघेही घरी होते़ मात्र, दुपारी १़३० वाजेच्या सुमारास सोनूसिंग यांनी घरात पडलेले विषारी द्रव प्राशन केले़ काही वेळानंतर त्यांना अस्वस्थ जाणवू लागले़ हा प्रकार त्यांच्या मुलास लक्षात येताच त्याने घराबाहेर धाव घेत आरडा-ओरड केली़ त्यावेळी परिसरातील नागरिकांसह नातेवाईकांनी त्याठिकाणी धाव घेतली़ नंतर कुटूंबीयांना सुध्दा घटनेची माहिती दिली़ त्यानंतर सोनूसिंग यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले़ मात्र, वैद्यकीय तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले़ यावेळी कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला़ मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे़ दरम्यान, आत्महत्तेचे कारण समजून आलेले नाही़ याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलिसात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विषप्राशन करून नाचणखेडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:12 PM