जळगाव : दुधाळ गायीसाठी लाखभर रुपये लागतात. पण 50 हजार रुपये कर्ज थकले म्हणून शेतक:याला आत्महत्येची वेळ येते. राज्यात शेतक:याची जनावराएवढीही किंमत राहीली नाही. देशात कृषी कजर्माफीसाठी 85 हजार कोटी रुपये द्यायला सरकार तयार नाही. दुसरीकडे 600 ते 700 मूठभर कजर्बुडव्या उद्योगपतींना नऊ लाख कोटींची कजर्माफी दिली जाते. सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी देशाच्या लोकसंख्येत फक्त तीन टक्के असलेल्या एक लाख 15 हजार कोटी रुपये बोजा दरवर्षाला सहन करण्याचा निर्णय केंद्र शासन घेते. अशा स्थितीत शेतक:यांचा दबाव गट निर्माण होण्याची गरज असून, आम्ही शेतक:यांच्या कजर्माफीसाठी, सातबारा कोरा होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथे आयोजित सभेत सांगितले. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रकाश पोकळे, रवीकांत तुपकर, भास्कर पाटील, जगतराव पाटील, नाना इखार, संभाजी पाटील, संजय घुगे, प्रताप पवार आदी उपस्थित होते. ैविमा कंपनीने फसविलेखरीप पीक विमा योजनेत फक्त उत्पादनाबाबत सुरक्षा दिली. गुणवत्तेचा मुद्दा समाविष्ट केला नाही. पाऊस जादा पडल्याने ज्वारी, सोयाबीन काळवंडले. त्यांना दर मिळाला नाही. पण उंबरठा उत्पादन आल्याचे सांगून विमा कंपनीने भरपाई दिली नाही. कंपनीने फसवणूक केली. जागतिक तापमान वाढीला कारखानदार जबाबदार आहेत. त्यांचा त्रास नैसर्गिक आपत्तीच्या रुपाने शेतक:यांना सहन करावा लागतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. माझा शेतक:यांशी करारमला माङया भागातील लोकवर्गणी गोळा करून निवडून देतात. मी पाच वर्षे शेतक:यांसाठी काम करतो. हा पाच वर्षाचा करार मी शेतक:यांसोबत केलेला आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. कमी कर्ज थकलेल्यांचीही आत्महत्या50 हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज घेतलेल्या शेतक:यांनाही आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या सव्रेक्षणातून समोर आले. एक म्हैस 75 हजारांपुढे मिळते. जनावराएवढी किंमतही शेतक:याला नाही, अस संताप शेट्टी यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. मी त्या वेळेस त्यांच्यासोबत व्यासपीठावर असायचो. पण हे आश्वासन मोदींनी न पाळल्याने मी त्यांची साथ सोडली व शेतक:यांसोबत राहिलो आहे. मी लोकसभेत दीडपट हमीभावाचा ठराव मांडला तर त्यावर फक्त माङो एकच मत पडले. ही आश्वासने पाळत नसाल तर आम्ही गावागावात हा मुद्दा नेऊ, असेही शेट्टी म्हणाले.
शेतक:यांचा सातबारा कोरा करण्यासाठी न्यायालयात जाणार
By admin | Published: January 20, 2017 12:39 AM