शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचा शेतक:यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:04 PM

नाराजी : 63 हजार 839 शेतक:यांनी भरले कर्जमाफीसाठी अर्ज; 130 जणांना मिळाली दहा हजारांची उचल

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रशासनातर्फे किट वाटप

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 31 - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शासनाने कर्जमाफी जाहीर केली असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे सूचित केले आहे. परंतु, हे अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटींमुळे शेतक:यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, शेतक:यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.  आतार्पयत जिल्ह्यातील 63 हजार 839 शेतक:यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहे. शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यानुसार कर्जमाफीसाठी पात्र शेतक:यांनी ऑनलाइनच नोंदणी करून कर्जमाफीसाठी अर्ज ऑनलाइनच सादर करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार आतार्पयत संकेतस्थळावर 73 हजार 326 शेतक:यांनी ऑनलाइन नोंदणी केली  आहे. पैकी 63 हजार 839 शेतक:यांनी कर्जमाफीसाठी प्रत्यक्षात अर्ज भरल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शपथपत्र सादर करणा:या 130 शेतक:यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे.  कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर काहीसा दिलासा मिळाला. परंतु, त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी जे संकेतस्थळ दिले आहे. त्यात तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे शेतक:यांना महा ई सेवा, सीएससी सेंटर, संग्राम सेंटर येथे तासन्तास ताटळकत थांबावे लागत आहे. तरीही त्यांचे काम होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यातून पर्यायी मार्ग काढण्याची मागणी होत आहे.  धुळे जिल्ह्यात महा ई सेवा केंद्र 140, सीएससी सेंटर 650, तर संग्राम सेंटर 430 असे एकूण 1,220 केंद्र आहेत. पैकी महा इ सेवाचे 86 केंद्र, सीएससी 65, संग्राम सेंटर 225 केंद्रावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रशासनातर्फे किट वाटप केले आहे. 

कर्जमाफी मिळावी, यासाठी मी गेल्या 22 दिवसांपासून महा ई सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत आहे. परंतु, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे माङो कामच होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण सोडविण्यासाठी आज मला जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले. - रामचंद्र दशरथ पाटील,  शेतकरी, मोहाडी

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे शेतक:यांना अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. - बी. बी. साळुंखे,  जिल्हा  व्यवस्थापक, सेतू केंद्र