शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

शेतक-यांना पहिल्या टप्प्यात मिळणार ३८ कोटी २२ लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:22 PM

धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.

ठळक मुद्दे  भूसंपादन प्रकरण  २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड

जळगाव :  धरणासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला म्हणून पहिल्या टप्प्यात एक तृतियांश रक्कम ३२ कोटी २२ लाख रुपये गुरुवारी शासनाने न्यायालयात भरले असून ही रक्कम मुंदखेडा व पातोंडा (ता.चाळीसगाव) येथील शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, २०५ प्रकरणात १६० कोटी रुपयात तडजोड झाली आहे.तापी पाटबंधारे महामंडळाने २००० मध्ये धरणाकरीता चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा व पातोंडा येथील २०५ शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन केले होते. २००६ मध्ये मोबदला देण्याचे निश्चित झाले. मात्र मोबदला मिळत नसल्याने शेतक-यांनी २०१० मध्ये न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०१५ मध्ये लागला. रक्कम कमी मिळत असल्याने शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेली. खंडपीठाने रक्कम वाढवून देण्याचे आदेश दिले.विधी सेवा प्राधिकरणाचे यशया रकमेच्या मोबदल्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाने पुढाकार घेऊन शेतकºयांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यासाठी १६० कोटी पेक्षा जास्त रक्कम देण्याचे निश्चित झाले. त्याचा पहिला टप्पा एक तृतियांश रक्कम गुरुवारी शासनाने कोषागारात भरले. उर्वरित सर्व रक्कम वर्षभरात दोन टप्प्यात शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

भूसंपादन झालेल्या शेतक-यांनी दाखविलेला संयम, समजदारी आणि भूसंपादन करणाºया यंत्रणांनी दाखविलेले सहकार्य यामुळेच लाभ देणे शक्य झाल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मनोगतात सांगितले. यशस्वी तडजोड व रक्कम जमा झाल्याबद्दल शेतकºयांनी न्या.सानप तसेच जिल्हा सेवा विधी प्राधीकरणाचे सचीव के.एच.ठोंबरे यांचा सत्कार केला. दरम्यान, मध्यस्थीने अशाप्रकारे २०५ शेतकºयांना भूसंपादन मोबदल्यापोटी एवढी मोठी रक्कम मिळाल्याचे राज्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, पॅनल विधीज्ञ अ‍ॅड शिंदे, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी, अ‍ॅड मंजू वाणी, सचिव अ‍ॅड. योगेश गावंडे, शतकºयांच्या वतीने  अ‍ॅड. एन.आर.लाठी, अ‍ॅड.आर.डी.झाल्टे, अ‍ॅड. मनोज पाचपोळ, यांनी काम पाहिले.तापी महामंडळातर्फे अ‍ॅड. देवप्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

बळीराजांनी केले शासनाला २५ कोटीचे व्याज माफसद्यस्थितीत दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना, दुसरीकडे मुंदखेडा व पातोंडा येथील शेतकºयांनी १६० कोटींच्या रक्कमेवरील १५ टक्कयांप्रमाणे व्याजाचे २५कोटी माफ करुन आदर्श उभा केला आहे. त्यामुळे शासनाचे २५ कोटी रुपये वाचणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव