लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतकऱ्यांना आता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फतच कर्ज मिळणार असून त्यातील ५० टक्के कर्ज रोखीने तर ५० टक्के एटीएमद्वारे काढता येणार आहे. ऊस उत्पादकांनाही विना हमीपत्र कर्ज वितरणासह जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, परंतु ज्यांची शेती शेजारच्या जिल्ह्याच्या हद्दीत आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्ज पुरवठा केला जाणार आहे. हे तीन महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची तहकुब बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पवार यांची चेअरमन निवडीनंतरची ही पहिलीच बैठक होती. व्हाईस चेअरमन अमोल पाटील, आमदार एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, ॲड. रोहीणी खडसे-खेवलकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड.रवींद्र पाटील, जनाबाई महाजन यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज देताना कारखान्याचे हमी पत्र आवश्यक होते. १५ वर्षापूर्वी बँकेने तसा निर्णय घेतलेला होता. आता साखर कारखाने खासगी तत्वावर चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्याशिवाय जिल्ह्यातील रहिवाशी शेतकऱ्यांच्या जमीन लगतच्या धुळे, औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यातील गावांमध्ये आहे. त्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात येत होते. हे दोन्ही निर्णय देखील बँकेने रद्द केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना थेट बँकेमार्फत कर्ज घ्यायचे असेल तर ती देखील मुभा देण्यात आली आहे.
‘त्या’ घोषणेची अमलबजावणी कराविकासो बळकटीकरणासाठी गट सचिवांचा पगार बँकमार्फत करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण व चेअरमन संजय पवार यांनी चेअरमननिवडीच्या दिवशी केली होती. या घोषणेची आठ दिवसात अमलबजावणी करावी अशी अपेक्षा खडसे व आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
उध्दव ठाकरेंच्या सभेला जाणारउध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे २३ रोजी सभा होत आहे. महाविकास आघाडी या नात्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सहकार्य करेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला जातील, असे खडसे यांनी स्पष्ट केले