जळगाव - विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन ऑफ इंडियाच्यातर्फे सोमवारपासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आला आहे. श्रीनिवास प्राेजेक्टमधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करावी, चौपदरीकरणाच्या कामात मरूम, कच्चे दगड यांचे प्रमाण कमी वापरण्यात आले आहे, याची चौकशी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष कैलास पारधी यांनी उपोषण सुरु केले आहे.
००००००००००००००००००००००
विद्या स्कूलमध्ये रेड डे साजरा
जळगाव : विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन रेड डे साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी घरातील लाल रंगाच्या वस्तू एकत्र लाल रंगासोबत मैत्री केली आणि लाल रंगाच्या वस्तुंची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक हॅरी जॉन, कामिनी भट यांनी परिश्रम घेतले.
००००००००००००००००००००००००
शेतकरी वारसांना कर्जमाफी द्यावी
जळगाव : महाआघाडी सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफी योजना काही दिवसांपूर्वी जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी मयत झाले असून त्यांच्या वारसांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे या वारसांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी भादली येथील प्रमोद पाटील यांनी केली आहे.