कुंदन पाटील
जळगाव :पानीपत (हरियाणा) येथील टोलनाक्याच्या नावावरुन जळगावात उभ्या असलेल्या कारवरच्या ‘फास्टटॅग’च्या माध्यमातून ४० रुपयांची रक्कम बॅंक खात्यातून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.हा प्रकार पाहून धक्का बसलेल्या कारमालकाने यासंदर्भात अनेकांशी चर्चा केल्यानंतर ‘फास्टटॅग’कांड करणारी टोळ्या देशभरात सक्रिय झाल्या असल्याचे उजेडात आले आहे.
सुभाष महाजन असे या कारमालकांचे नाव आहे.त्यांची कार गेल्या दोन दिवसांपासून जळगावातच आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या मोबाईलवर आला. त्यानुसार पानीपत (हरियाणा) येथील एका टोलनाक्यावरुन त्यांच्या कारवरच्या फास्टटॅगच्या माध्यमातून ४० रुपयांची रक्कम कपात झाली. हा संदेश पाहून महाजन यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी सायबर क्राईमशी निगडीत जाणकारांशी चर्चा केली. त्यानंतर ‘लोकमत’ने हा प्रकार हाताशी घेऊन सायबर क्राईमची देशाची राजधानी असलेल्या जामताडा (झारखंड) पोलिसांशी संपर्क केला.
तेव्हा त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘फास्टटॅग’च्या माध्यमातून बॅंक खात्यातून रक्कम काढण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या देशभरात सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र या स्वरुपाच्या गुन्ह्यांची उकम मात्र अद्याप झालेली नाही.त्यामुळे अशा स्वरुपाचे गुन्हे करण्यासाठी कुठली पद्धत अवलंबली जाते, याविषयी सविस्तर माहिती हातात नसल्याचे त्यांनी सांगितले.
जामताडा सायर क्राईमला असताना पंजाबमधील एका कारमालकाच्या बॅंक खात्यातून आसामच्या टोलनाक्याच्या नावाने रक्कम कपात करण्यात आली होती. त्यानंतर अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्यांचा शोधजारी आहे.-संजयकुमार, पोलीस निरीक्षक, जामताडा.