धुळे : अर्थसंकल्पात 1 टक्का एक्साईज डय़ुटीसह विविध जाचक तरतुदींच्या निषेधार्थ 10 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे व्यापा:यांसह आता कारागिरांचेही हाल होऊ लागले आहेत. केंद्र सरकार अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदी आणि व्यापारी बंद मागे घेण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवावा, असा यक्ष प्रश्न स्थानिक तसेच परप्रांतीय मिळून सुमारे 1200 कारागिरांपुढेही उभा आहे. बंगाली कारागिरांनी तर परतीची वाट धरली आहे. ऐन लगAसराईच्या हंगामात ही स्थिती उद्भवल्याने कारागिरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. आता सरकारच्या निर्णयावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. सराफा बाजारात व्यापा:यांची शंभरावर दुकाने आहेत. कलाकुसरीचे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम मुख्यत्वे बंगाली कारागीर करतात. येथे या कारागिरांची संख्या सुमारे 500 एवढी आहे. त्यात काही कुटुंबांसह येथे आले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या या कारागिरांची संख्या 700-800 वर पोहचते. स्थानिक मराठी अहिर सुवर्णकार कारागिरांची 50 कुटुंबे या व्यवसायात आहेत. एका कुटुंबात सरासरी तीन सदस्य धरले तरी 150 ते 200 जणांचा उदरनिर्वाह कारागिरीवर अवलंबून आहेत. सोन्या-चांदीच्या विविध दागिन्यांची दुरुस्ती, नाक-कान टोचणे, दागिन्यांना पॉलिश अशी कामे हे कारागीर करतात. दिवसाकाठी 200-250 रुपये मिळतात. त्यावर घर चालते. परंतु आता तेच ठप्प झाल्याने स्थिती अडचणीची झाली आहे. कोल्हापूर, सोलापूर येथून 40-50 वर्षापूर्वी येथे आलेल्या कारागीर कुटुंबांची संख्याही 40 र्पयत आहे. त्यांना गलई किंवा घाटी कारागीरही म्हटले जाते. ते प्रामुख्याने दागिने गाळण्याचे (गलई) काम करतात. परंतु सध्या बंदमुळे त्यांनाही काम उरलेले नाही. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मारवाडी सुवर्णकार कुटुंबांची संख्याही मोठी आहे.
परप्रांतीय कारागिरांचे भवितव्य टांगणीला
By admin | Published: March 12, 2016 12:38 AM