जळगाव : रेल्वेस्थानकावर हबीबगंज, कुर्ला एक्स्प्रेसमोर आल्याने सुनील तुलसीदास कावणा यांचा शुक्रवारी मध्यरात्री जागीच मृत्यू झाला होता़ शनिवारी सकाळी उपचारादरम्यान सात वर्षीय बालक यश कावकावणा याचाही मृत्यूही झाला असून आई कीर्ती गंभीर जखमी आहे़ बाप सुनील व मुलगा यश या दोघांची एकाच वेळी सिंधी कॉलनीतून अंत्ययात्रा निघाली़ दरम्यान मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा मृत्यू झाला नसता, अशी खंत अशोक मंधान यांनी व्यक्त केली़ याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिघांनी आत्महत्या केली की? त्यांचा अपघात झाला हे घटनेचे कारण गुलदस्त्यात आहे़रुग्णालयात बालकाचा मृत्यूयशवर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते़ डोक्याला खोलवर जखमी झाली होती़ यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला़ त्याची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे डॉ.संजीव हुजुरबाजार यांनी मंधान यांच्यासह नातेवाईकांशी बोलताना सांगितले़ स्वत:चा श्वास घेऊ शकत नसल्याने यशला कृत्रिम श्वासोच्छवासाचे मशीन लावण्यात आले होते़ यानंतर अनेक दिवस यश यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास त्याला नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले़ याठिकाणी १५ ते २० मिनीटांच्या काळातच येथील वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले़ घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे़ कीर्ती कावणा यांना जबर दुखापत आहे़ त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी पीएसआय खलील शेख व अनिंद्र नगराळे यांनी हॉस्पिटल गाठले़ मात्र त्या बोलण्याच्या परिस्थिती नसल्याने तिचा जबाब नोंदविता आला नाही़ कीर्ती यांच्या जबाबानंतर घटनेचे कारण स्पष्ट होईल.
पिता-पुत्रावर एकाचवेळी अत्यंसस्कार
By admin | Published: April 02, 2017 12:45 AM