जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून बुधवारी अक्षरश: कोरोनाचा विस्फोटच झाला. तब्बल एका दिवसात २०७ व्यक्तींचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याने आता पाच हजाराचा टप्पा ओलांडला असून ५ हजार १० इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन आहे़ दुसरीकडे जळगाव, भुसावळ व अमळनेरात कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्यामुळे या तिन्ही ठिकाणी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी लॉकडाऊनला जळगावकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दुसºया दिवशीही शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. दरम्यान, तपासणीसाठी ११५९ व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले होते़ स्वॅब तपासणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला असून त्यातील ७०० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर २०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे़ तर एका दिवसात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला़ विशेष म्हणजे, बुधवारी १५५ व्यक्तींनी कोरोनावर मात करून घरी परतले.याठिकाणी आढळले बाधितकोरोना बाधित रूग्ण आढळलेल्यांमध्ये अमळनेरात ३९, रावेर ३०, धरणगाव २३, जळगाव शहर २२, चोपडा व एरंडोल प्रत्येकी १८, मुक्ताईनगर १६, पाचोरा १०, भुसावळ ०८, जळगाव ग्रामीण ०७, बोदवड ०६, यावल व चाळीसगाव प्रत्येकी ०३, भडगाव, जामनेर, पारोळा व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ०१ रूग्णांचा समावेश आहे.
बाप रे ! कोरोनाचा संसर्ग थांबेना ; जिल्ह्याने ओलांडला पाच हजाराचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 7:05 PM