जळगाव: आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मुलीला व्हॉट्सअॅपवर पाठवून नामदेव मुकूंदा पाटील (वय 54, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांनी कार्यालयातच विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता टॉवर चौकातील जिल्हा बॅँक वरिष्ठ कर्मचा:यांच्या सोसायटीत घडली. कार्यालयात कामाचा प्रचंड ताण व कपाटातील कागदपत्रांची झालेली उलथापालथ यामुळे पाटील यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जिल्हा बॅँकेच्या कर्मचा:यांची टॉवर चौकात पतसंस्था आहे. त्यात नामदेव पाटील हे गेल्या 30 वर्षापासून सचिव पदावर कार्यरत होते. दुपारी 1 ते 2 ही जेवणाची वेळ असल्याने सर्व कर्मचारी जेवणासाठी घरी गेले होते. दोन वाजेच्या सुमारास शिपाई नामदेव परभत पाटील हे कार्यालयात आले असता त्यांना पाटील हे जमिनीवर लोळलेले व तोंडातून फेस येत असल्याच्या स्थितीत दिसले. त्यांनी तातडीने ही घटना कार्यालयातील सहका:यांना सांगून अन्य कर्मचा:यांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा इसीजी करण्यात आला व त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व आशिष रोही यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यांच्या खिशातील पाकीट, कागदपत्रे व सुसाईड नोट हस्तगत केली.मुलीला पाठविली चिठ्ठीआत्महत्या करण्यापूर्वी पाटील यांनी एक पानाची चिठ्ठी लिहिली ती 1.32 वाजता मुलीच्या मोबाईलवर पाठविली. ही चिठ्ठी पाहताच मुलगी मृणालिनी व प}ी नंदा यांनी जिल्हा रुग्णालय गाठले,त्यांचा मृतदेह पाहताच मायलेकींनी हंबरडा फोडला. त्यानंतर कार्यालयातील सर्व कर्मचा:यांनी धाव घेतली. मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनीही रुग्णालयात धाव घेतली. पाटील हे सोनवणे यांचे जवळचे नातेवाईक होते.मुलगा पुण्यात खासगी नोकरीलापाटील यांना नितीन व व मृणालिनी हे दोन मुले आहेत. मृणालिनी ही मोठी असून घरीच असते तर नितीन हा अभियंता असून पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. दहिंदुल्ले, ता.धरणगाव हे त्यांचे मुळ गाव आहे.
मुलीला व्हॉट्सअॅपवर चिठ्ठी पाठवून पित्याने घेतले विष
By admin | Published: February 01, 2017 12:59 AM