बी.एस.चौधरीएरंडोल : सहकार क्षेत्राला वाईट दिवस आले असताना जिल्ह्यात सहकाराचे ‘शिव’धनुष्य पेलून धरण्याचे कार्य एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील व त्यांचे पुत्र अमोल पाटील हे करीत आहेत. सहकार क्षेत्राची दैना, सहकारी पतपेढ्यांची डबघाई आणि या क्षेत्रावरील नागरिकांचा उडालेला विश्वास अशा बिकट परिस्थितीत ‘सहकारा’ला संजीवनी देऊन त्यात प्राण ओतण्याच्या कामात या पिता-पुत्राचा सिंहाचा वाटा आहे.चिमणराव पाटील यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा सहकारातील हा वारसा आणि वसा घेऊन अमोल पाटील यांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे. ते पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती असून जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत.अमोल पाटील यांनी सहकाराबरोबर शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ते मार्गक्रमण करीत आहेत. चिमणराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात कामे करून जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.त्यांचे पुत्र अमोल पाटील यांनी देखील त्यांच्या कार्याचा वसा घेऊन वारसा समर्थपणे सिद्ध करीत आहेत. तसेच तरूण वर्गात एक उदयोन्मुख व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
सहकार क्षेत्रातील पिता पुत्राची ‘अमोल’ कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:02 PM