प्रमोद पाटील
कासोदा, ता. एरंडोल, जि.जळगाव : शालेय शिक्षण घेत असतानाच दीर्घ आजाराने आई वारली, पण तत्पूर्वी आईच्या आजारपणाचा मोठा खर्च, त्यानंतर आलेला अकाली मृत्यू, पुढे माझे शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी मला नोकरी लागेपर्यंत वडिलांनाच पार पाडावी लागली आहे. आई-वडील व परमेश्वर हे सर्वकाही माझ्यासाठी वडीलच आहेत, अशा भावना जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केल्या आहेत.२० जूनला साजऱ्या होणाऱ्या पितृदिनानिमित्त जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या.अजाबसिंग बळीराम शिंदे हे तसे मूळचे जैतपीर ता.अमळनेरचे. पण आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्या काळी अकरावीच्या वर्गानंतर पोटापाण्यासाठी अमळनेर सोडून यवतमाळ, जळगाव, मुंबई अशा ठिकाणी कामासाठी जावे लागले,पुढे टेलरींगचा कोर्स केल्यानंतर परत अमळनेर येथे येऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी टेलरींग काम शिकवण्याचे क्लास सुरू केले. त्यातच पत्नीला गंभीर आजार जडला. पत्नीचा आजारपणाचा खर्च नऊ वर्षे केला.आई वारल्यानंतर चार बहिणी व मी अशांच्या शिक्षणाचा खर्च व कुटुंबातील खर्च यांची सांगड घालताना नाकीनऊ येत असतानाच मोठ्या धीराने व आत्मविश्वासाच्या जोरावर वडिलांनी चार बहिणींचे लग्न व मला इंजिनिअर बनवण्याचे अशक्यप्राय स्वप्न लीलया पार पाडले आहे.वडिलांचे जास्त शिक्षण झालेले नसताना तसेच आम्ही खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षणाची सवलत नव्हती. योग्य कॉलेज शोधणे, त्या कॉलेजची महागडी फी भरणे, जेवण व राहण्याचे खर्च हे मोठे दिव्य काम त्यांनी पार पाडले आहे.ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ह्यआईह्णपणपण बाप हा बाप असतो. निधड्या छातीने संकटांवर मात करण्याचे कसब त्याला कुठल्याही शाळेत शिकायला जावे लागत नाही. आपल्या एकुलत्या मुलांसाठी कष्ट करायला चार हात करण्यासाठी त्याची इम्युनिटी दहा पट वाढते. असे धिरोदात्त माझे पिता अजबसिंग शिंदे यांनी मला उच्च शिक्षित इंजिनिअर बनवले. देशातील अग्रगण्य अशा एका नामांकित कंपनीत मुंबईत प्रोग्राम मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदावर मी कार्यरत आहे. याचे श्रेय माझ्या जन्मदात्याला जाते. ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ह्यआईह्णपण आहेत, अशी भावनाही जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केली.