राज्याध्यक्षपदी रावेरचे पाटील
रावेर, जि. जळगाव : राज्य माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी जे. के. पाटील यांची (रावेर) निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याला हा मान तिसऱ्यांदा मिळत आहे.
मुख्याध्यापक महासंघाच्या रविवारी झालेल्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची निवड झाली. ही निवड तीन वर्षांसाठी असेल.
पाटील हे खिरवड (ता. रावेर) येथील विकास माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच जिल्हा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. यापूर्वी खिरोदा येथील ध. ना. चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. चौधरी व उचंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक यु. डी. .............. यांनी महासंघाचे राज्याध्यक्षपद भूषविले आहे.
कोट
राज्यभरातील मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक वा प्रशासनिक समस्या, शिक्षण मंडळे तथा शासनस्तरावर नेऊन त्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्यासाठी भर राहील. तसेच केंद्र सरकारने अमलात आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करताना महत्त्वाची भूमिका आपण बजावणार आहोत.
- जे. के. पाटील, रावेर, जि. जळगाव.