विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ग्रामस्थांचे आराध्य दैवत खबुलाल महाराज यांच्या समाधीस्थळी १३ व १४ रोजी दोन दिवस यात्रोत्सव आयोजित केला आहे.खबुलाल महाराज हे तसे पाहिले तर वंजारी समाजाचे ग्रामदैवत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथील साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वंजारी बांधव या ठिकाणी नवस फेडून मगच ऊस तोडणीसाठी रवाना होतात. गावात वंजारी समाजाचे एकही घर नाही. येथील सुभाष हिलाल पाटील यांच्या शेतातच महाराजांचे समाधी मंदिर आहे. तेच मंदिराची सेवा करतात. मनोकामना पूर्ण करणारे दैवत, अशी येथील ख्याती आहे.यात्रेनिमित्त बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेले नागरिक यात्रेला हजेरी लावतात. यात्रेत संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ तसेच करमणुकीची साधने थाटण्यात आली आहेत. भाविकांनी यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहान सरपंच रावसाहेब पाटील, उपपसरपंच भूषण पाटील, ग्रामसेवक आर.बी.पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच पोलीस पाटील प्रभाकर भिकन पाटील व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी मेहुणबारे पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आजपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 7:18 PM
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ग्रामस्थांचे आराध्य दैवत खबुलाल महाराज यांच्या समाधीस्थळी १३ व १४ रोजी दोन दिवस यात्रोत्सव आयोजित केला आहे.
ठळक मुद्देखबुलाल महाराज वंजारी समाजाचे ग्रामदैवतबाहेरगावी गेलेले नागरिक यात्रेला लावतात हजेरीयात्रेत संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ तसेच करमणुकीची साधने थाटली