जळगाव / चाळीसगाव : ४५ दिवसांच्या दीर्घ उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी शाळांच्या घंटा घणघणल्या. जळगाव शहरासह जिल्ह्यात सकाळी प्रवेशोत्सव साजरा करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षक मतदार संघातील निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने राजकीय पदाधिका-यांना प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात नो एन्ट्री होती. उर्दू माध्यमातील शाळा रमजान ईद नंतर १८ रोजी सुरु होत या शाळांच्या प्रवेशव्दाराला कुलूपे दिसून आली.नवा गणवेश...नवे दप्तर...नवी पुस्तके...अशा उत्साहाच्या सुगंधी वातावरणात शाळांसह विद्यार्थ्यांचा आनंद ओंसाडून वाहत होता. बालकमंदिरासह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वषार्ला शुक्रवारी वाजत-गाजत सुरुवात झाली.शाळांच्या प्रवेशव्दारांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सनईचे मंगल स्वर, मिष्टान्नाचा खमंग दरवळ, ढोल-ताश्यांचा गजर अशी धामधूम शाळांमध्ये होती.पुस्तके अपूर्णशाळेच्या पहिल्याच दिवशी पूर्ण पुस्तके देण्याचे ढोल शिक्षण विभागातर्फे वाजविले गेले. मात्र शुक्रवारी इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी गणित, परिसर अभ्यास या विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत. पहिलाचा अभ्यासक्रम बदलला असल्याने येत्या दोन दिवसात नविन पुस्तके येतील. असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.राजकीय पदाधिका-यांना नो एन्ट्रीशिक्षक मतदार संघाची निवडणुकीची आचार संहिता असल्याने गुरुवारी जि.प.तर्फे प्रवेशोत्सवात राजकीय पदाधिका-यांना सहभागी करुन घेऊन, असे कळविण्यात आले होते. त्यामुळे मुलांचे स्वागत गुरुजी आणि बाईंनी केले.नवी पुस्तके, गुरुजीही नवेजि.प.शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रिया नुकतीच पुर्ण झाली. यामुळे बहुतांशी शाळांमध्ये बदली झालेले शिक्षक रुजू झाल्याने नवे गुरुजी पाहून पहिल्याच दिवशी मुले हरखून गेली.काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रतिक्षान.पा.शाळा क्र.चार मध्ये शिक्षक उपस्थित आणि विद्यार्थी नाही. अशी स्थिती पहावयास मिळाली. शिक्षकांनी गुरुवारी प्रवेशोत्सवासंबंधी पालकभेटी घेतल्या. मात्र तरीही शुक्रवारी मुलांनी शाळेकडे पाठ फिरवली. असे दिसून आले. शाळा मुस्लिमबहुल भागात असल्याने आणि उर्दू माध्यमातील शाळा १८ रोजी सुरु असल्याने विद्यार्थी आले नाहीत. असे शिक्षकांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात शाळांमध्ये घणघणल्या प्रवेशोत्सवाच्या घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:33 PM
स्कूल चले हम
ठळक मुद्देवाजत-गाजत, मिष्टान्न आणि पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागतपुस्तके अपूर्ण