लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून कमी रुग्णसंख्या समोर येत आहे. मात्र, प्रत्यक्षात चाचण्यांच्या तुलनेत असलेली पॉझिटिव्हिटी ही कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी ही १५ ते १८ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आली आहे. चाचण्या कमी रुग्ण कमी असे हे चित्र आहे. दरम्यान, शहरात मात्र, चाचण्यांमध्ये बाधितांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा डाऊनफॅाल सुरू झाल्याचेही बोलले जात आहे.
गेल्या दोन दिवसांची व अन्य दिवसांच्या चाचण्यांची तुलना केली असता दोन दिवसात ॲन्टीजन व आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण अन्य दिवसांच्या मानाने कमी समोर आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्यामागचे हे एक कारण असू शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, येत्या काही दिवसात हे चित्र कायम राहिल्यास कोरोना कमी हेात असल्याचा दिलासा मिळणार आहे.
मृत्यू रोखणे आव्हान
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, यात गंभीर रुग्णांचे प्रमाण दुसरीकडे वाढत असून मृतांची संख्या कमी होत नसल्याचे गंभीर चित्र आहे. त्यातच गेल्या दोनच दिवसात ४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पॉझिटिव्हिटी
१४ एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी : १८ टक्के
१५ एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी : १५ टक्के
झालेल्या चाचण्या
१४ एप्रिल ॲन्टीजन ५५३२, बाधित ७८५
आरटीपीसीआर आलेले अहवाल ९५२, बाधित १९९
१५ एप्रिल ॲन्टीजन ५६८७, बाधित ६२७
आरटीपीसीआर आलेले अहवाल १९९९, बाधित ३०७