भुसावळ/वरणगाव/दीपनगर (जि.जळगाव) : भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया सहा वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या गेटसमोर राष्ट्रीय महामार्गावर राखेचे टँकर (बलकर) हे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यातील निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व सहकारी पो.कॉं.संदीप राजपूत, सुनील शिंदे, इस्तियार सैयद, सुनील चौधरी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक करेवाड यांनी राखेचे टँकर बाजूला करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी संशयित आरोपी अमर जगबिदर संसोये (वय २४, रा.निंभोरा) व कुलदीप एकनाथ महाले (रा.समतानगर) यांनी करेवाड यांना टँकर सोडा, अन्यथा महागात पडेल, अशी धमकी दिली. तरीही करेवाड यांनी तुम्ही रस्त्यात अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे टँकर बाजूला करा, अशा सूचना केल्या. यावेळी दोघांनी करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. यात त्यांच्या चेहºयावर डाव्या बाजूला, गालावर, त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या बोटात करंगळीला मार लागला. यावेळी पोलिसांनी दोघांंना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणले.दरम्यान, दीपनगर प्रकल्पासमोर महामार्गावर वाहनधारकांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने अस्ताव्यस्त स्थितीत राखेचे टँकर (बलकर) उभे केलेले आहेत, असा व्हिडिओ सुज्ञ वाहनधारकांनी काढून जिल्हा पोलीस अधीक्षकांना जळगावी पाठवला होता. त्यामुळेही वाहतूक अडथळ्याचे गांंभीर्य वाढले होते.यासंदर्भात पीएसआय करेवाड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर भादंवि कलम २८३ प्रमाणे सहा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.महामार्गावरील राखेच्या टँकरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. वाहनधारकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
दीपनगर येथे फौजदारास धक्काबुक्की करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:05 PM
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली.
ठळक मुद्देवाहतुकीस अडथळा ठरणारे राखेचे टँकर बाजूला करताना घडला प्रकारदोघा आरोपींना अटकवाहतुकीस अडथळा करणाऱ्या सहा वाहनचालकांवरही कारवाईवाहतूक अडथळ्याचा व्हीडीओ पोलीस अधीक्षकांना मिळाल्याने वाढले ट्रॅफिक जामचे गांभिर्य