भुसावळ : भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडका रोड भागातील रहिवाशांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी सर्वच भागातील शहरवासीयांची वणवण सुरू आहे.तापी नदीवरील बंधाºयातील पाणी पातळी खालावली आहे. बंधाºयात पाणीच नसल्यामुळे पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवावी लागली, अशी स्थिती निर्माण झाली होती.१२ रोजी दुपारी हतनूर धरणातून आवर्तन सुटल्यामुळे रविवारपासून शहरवासीयांना रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश लाड यांनी दिली.महत्वाकांक्षी अमृत योजनच्या पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी अंथरण्याचे काम सर्वच प्रभागात सुरू आहे. त्यामुळे जुन्या पाईपलाईनवर काम करत असताना अनेक ठिकाणी तिला गळती लागली आहे, यातच आशिया महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.खडकारोड भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे जोडणी करूनही काही प्रमाणात गळती सुरूच आहे. शिवाय खडकारोड शिवारात यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. ऐन हिवाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
भुसावळातील खडका रोडवर भीषण पाणी टंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:24 PM
भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडका रोड भागातील रहिवाशांना १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
ठळक मुद्देअमृत व गळतीमुळे पाणी पुरवठ्यावर परिणामरविवारपासून रोटेशननुसार होणार पाणीपुरवठा१० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा