शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

यावल येथे पाचव्या दिवशी श्री विसर्जन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:41 IST

यावल शहरासह तालुक्यातील पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

चुंचाळे, ता.यावल : यावल शहरासह तालुक्यातील डांभुर्णी, दहिगाव, सावखेडासीम, कोरपावली या गावांमधील पाच दिवसांच्या बाप्पाला बुधवारी शांततेत निरोप देण्यात आला.यावल शहरात विनावाद्य जागेवर आरती करून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुपारी १ वाजेलाच सर्व सार्वजनिक १७ मंडळांनी विर्सजन केले. पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. या ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती नागरिकांनी आणून दिल्या होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच दिवसीय गणेशोत्सवाची सांगता बुधवारी झाली. एरव्ही वाद्यवृंदाच्या गजरात रात्री बारा वाजेपर्यंत चालणारी विसर्जन मिरवणूक यावेळी मात्र, दुपारी एक वाजेलाच संपली. सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी जागेवर आरती करून मंडळाचे चार ते पाच पदाधिकारी कार्यकर्ते मूर्ती विसर्जनसाठी रवाना झाले.दरम्यान, शहरात घरगुती गणेश मंडळासाठी मूर्ती संकलनासाठी रेणुका देवी मंदिर, भवानी पेठ, जुना भाजीबाजार, बारी वाडा, गवत बाजार, देशमुख वाडा, देशपांडे गल्ली, म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, सुंदर नगरी, वाणी गल्ली बालसंस्कार शाळेजवळ, संभाजी पेठ, सुतार वाड्याजवळ व विस्तारीत भागासाठी फालक नगर भुसावळ रस्त्यावर केंद्र उभारण्यात आले होते.या ठिकाणी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, मुख्याधिकारी बबन तडवी, पालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, योगेश मदने या पथकाने नागरिकांकडून मूर्ती संकलित केल्या. नंतर संकलित मूर्र्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळात सर्व प्रथम विसर्जन सकाळी १० वाजता समस्त बारी पंच मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष दगडू रूपा बारी, भास्कर गंभीर बारी, काशिनाथ महारू बारी या पदाधिकाऱ्यांनी तापी नदीत जाऊन केले.शहरात १९२८ पासून अखंडपणे या मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा आहे. यंदा कोरोना विषाणूची पार्श्वभूमी ज्येष्ठ व वृध्दांनी विसर्जन केले व शासन आदेशाचे पालन करीत तरूणांपुढे आदर्श ठेवला आहे.ग्रामीण भागातील डांभुर्णी, दहिगाव, सावखेडासीम, कोरपावली गावातदेखील दुपारपर्यंत विसर्जन करण्यात आले होते. विविध ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस कर्मचारीदेखील विसर्जनाकरिता गेले होते. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, पोलीस कर्मचारी बंदोबस्त होता.शहरातील विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे हेदेखील दिवसभर पोलिस ठाण्यात थांबून शहर व परिसरावर लक्ष ठेवून होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल